Friday, July 05, 2024 06:16:33 AM

मुस्लिम आरक्षण रद्द करू

मुस्लिम आरक्षण रद्द करू

जानगाव, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली. सत्तेत आलो तर तेलंगणामधील मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण रद्द करू. हे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांमध्ये वाटले जाईल; असे अमित शाह म्हणाले. याआधी भाजपाची सत्ता आली तर अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन मोफत देऊ, असे अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत म्हणाले.

तेलंगणातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर अमित शाह यांनी टीका केली. सत्तेत आल्यावर भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे अमित शाह यांनी सांगितले. तेलंगणात एमआयएमच्या ओवैसींच्या भीतीने हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जात नाही. पण भाजपाची सत्ता आली तर पुन्हा एकदा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यास सुरुवात केली जाईल, असेही अमित शाह म्हणाले.

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या ११९ जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

        

सम्बन्धित सामग्री