Sunday, October 06, 2024 02:23:01 AM

उद्धव गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा

उद्धव गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी उद्धव गटाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते पालव यांच्यावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

शनिवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये जमले होते. जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

शिंदे आणि उद्धव गटात मुंब्र्यातील शाखेवरून काही दिवसांपुर्वी मोठा वाद पेटला. ११ नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथे दोन्ही गटांत मोठा राडा झाल्याचे दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.

"मुंब्र्यात फुसका बार आला आणि वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा इतका आवाज होता की त्यांना यू टर्न घ्यावा लागला.", अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकत्यांकडून अक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


सम्बन्धित सामग्री