Monday, July 08, 2024 10:20:04 PM

कार्तिकी यात्रेसाठी नियोजन

कार्तिकी यात्रेसाठी नियोजन

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे १४ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कार्तिकी यात्रा आहे. या यात्रेसाठी नियोजन करण्याकरिता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक येतात. भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन, मंदिर समिती, जिल्हा नियोजन समिती यांच्या निधीतून तसेच सीएसआर फंडातून खर्च करून सोयीसुविधा आवश्यक तेवढ्या सोयीसुविधा निर्माण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. शहरात स्वच्छता राखावी, असेही निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. यात्रा काळासाठी पाच नियंत्रण कक्ष आणि एक केंद्रीय नियंत्रण कक्ष अशा सहा कक्षांची निर्मिती केली जाणार आहे. या कक्षांच्या माध्यमातून नियोज केले जाईल. स्कायवॉकवर आसन व्यवस्था केली जाणार आहे.

कार्तिकी एकादशी गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. या दिवशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कार्तिकी यात्रेच्या काळात पंढरपूरमध्ये जनावरांचा बाजार भरणार आहे. या बाजारात आजारी प्राण्यांना प्रवेश नसेल.


सम्बन्धित सामग्री