Friday, July 05, 2024 02:51:07 AM

'अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं'

अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं

बारामती,५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात तब्बल २ हजार ३९६ ग्रामपंच्यातिच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुण्यात देखील बारामती तालुक्यातील काही ग्रामपंच्यातीसाठी मतदान होत आहे. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी देखील काटेवाडी येथील मतदान केंद्रात येऊन मततानाचा हक्क बजावला.

राज्यात रविवारी ग्रामपंच्यात निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. अनेक दिग्गज व्यक्तिची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागणार आहे. राज्यात नागपूर, बीड, पुणे, हिंगोली आदि जिल्ह्यात निवडणुका आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील काटेवाडी येथील मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी त्यांच्या हयातीत मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा माध्यमांपुढे व्यक्त केली.

माध्यमांसमोर आशाताई पवार म्हणाल्या,
“अजित पवार हे सध्या आजारी आहे. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला असून यामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत. १९५७ पासून मी मतदान करत असून पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले अजितवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच अजितने मुख्यमंत्री व्हावे. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, त्यामुळे पुढे काय होते ते आता पाहुयात'', असेही त्या म्हणाल्या.


सम्बन्धित सामग्री