Tuesday, July 09, 2024 12:55:48 AM

राज्यात ईडीची मोठी कारवाई!

राज्यात ईडीची मोठी कारवाई

राज्यात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून ३१५ कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने काही महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. त्या आधारावर ईडीकडून मनीलाँड्रीग प्रकरणी तपास सुरू होता. या तपासात मनी लाँड्रींग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांच्या बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

           

सम्बन्धित सामग्री