Thursday, July 04, 2024 10:30:27 AM

'उपोषण मनसेचं काम नाही'

उपोषण मनसेचं काम नाही

ठाणे, ८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: ठाण्यात टोल दरवाढी विरोधात मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसे ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधाव हे गेल्या ४ दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणाला भेट दिली. जाधवांनी ठाकरेंना यावेळी निवेदन दिले. त्यांनतर राज ठाकरे त्या ठिकाणहून लगेच निघून गेले. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले कि,

उपोषण हि पद्धत मनसेची नाही. मी अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यालाला लावले आहे. आम्ही ६५ टोल आम्ही बंद केले. मात्र सरकार काहीच करत नाहीये. मी येत्या २-३ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा करणार असून मी नंतर या विषयी अजून बोलीन. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

सर्वसामान्य जनता स्वतःला होणार त्रास ऐन निवडणुकीत नेहमीच विसरत असते. मतदान करतांना कोणत्याही गोष्टीवर लोक विश्वास ठेवतात. शिवसेना आणि भाजपने जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची भूमिका मंडळी होती. पत्रकार त्यांना प्रश्न विचारात नाहीत. एकनाथ शिंदे पण ठाण्याचे आहेत. निवडणूक जवळ येते आहे. अशावेळी टोलचा त्रास त्यांनाही होऊ शकतो असे राज ठाकरे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री