Tuesday, July 02, 2024 08:17:26 AM

'शिंदेच मराठा समाजाला न्याय मिळवून देतील'

शिंदेच मराठा समाजाला न्याय मिळवून देतील

जालना, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवसांपासून सुरू असलेलेल उपोषण मागे घेतले. यावेळी बोलताना जरांगेंनी शिंदे आपल्याला न्याय मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणाला केवळ शिंदेच न्याय देऊ शकतील, असेही जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडूनच आरक्षण मिळवेन, असे पण जरांगे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=3RyTfg5P79s

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्यांची भेट घेतली. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेत असताना जरांगेंनी आरक्षण समर्थकांना उद्देशून छोटेखानी भाषण केले. यावेळी बोलताना मराठा समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही, अशी ग्वाही दिली. मराठ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा, असेही जरांगे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबत प्रमुख मंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंशी चर्चा केली. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या मंत्रिमंडळातील निवडक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आणि दोन सरकारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे काय बोलले ?
१. शिंदे आपल्याला न्याय मिळवून देतील
२. मराठा आरक्षणाला केवळ शिंदेच न्याय देऊ शकतील
३. मी शिंदेंकडून आरक्षण मिळवणारच
४. मराठा समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही
५. मराठ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा


सम्बन्धित सामग्री