Sunday, July 07, 2024 12:12:26 AM

छत्रपती संभाजीराजेंची टीका

छत्रपती संभाजीराजेंची टीका

नाशिक, ११ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीराजे माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी सरकारला केले. त्याबद्दल जाणून घेऊयात.

सर्वपक्षीय बैठक

आज सर्वपक्षीय बैठक आहे. कालच मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांचा फोन आला होता. समाजासाठी मी उपस्थित राहीन. सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं मला कौतुक आहे. भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवले ? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं. राणे समितीने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. यावर या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील याचा जाब विचारणार आहे.

शेतकरी आत्महत्या

कृषी धोरण ब्रिटिशांनी केलेलं आहे, त्यात बदल झालेला नाही. यासाठी लाँग टर्म पॉलिसी यायला हवी. कृषी मंत्री सध्या उत्तर सभा यात व्यस्त आहेत. जे काही राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना इंटरेस्ट नाही.

सातारा घटना

साताऱ्यात जी दुर्दैवी घटना घडली यासाठी सरकारने कायदा आणावा आणि वातावरण दूषित करणाऱ्या लोकांना थांबवलं पाहिजे.

नाना पटोले केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रयत्न आरोप

नाना पटोले काय बोलले, त्याबद्दल मला काही माहित नाही.


सम्बन्धित सामग्री