Sunday, June 30, 2024 10:04:52 AM

मोदी विरोधी गट फुटणार, नितीश आणि मोदी भेटणार ?

मोदी विरोधी गट फुटणार नितीश आणि मोदी भेटणार

नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधी गट फुटण्याची शक्यता वाढली आहे. जी २० गटांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद दिल्लीत सुरू आहे. या परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रात्री स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. या स्नेहभोजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील निवडक नेते पण उपस्थित असतील. विशेष म्हणजे या स्नेहभोजनाच्या निमित्ताने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रपती भवन येथे उपस्थित असतील. मोदी विरोधी गटाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी गटाचा एक नेता मोदींना स्नेहभोजनाच्या निमित्ताने भेटणार आहे. याआधी काही आठवड्यांपूर्वी पुण्यात मोदी विरोधी गटाचे खासदार शरद पवार आणि पंतप्रधान हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते. आता स्नेहभोजनाच्या निमित्ताने मोदी आणि नितीश एकाच ठिकाणी असतील. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


सम्बन्धित सामग्री