Saturday, July 06, 2024 11:14:15 PM

first-woman-to-chair-railway-board
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही बाब भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची तसेच अभिमानास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या १०५ वर्षांच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आज (१ सप्टेंबर २०२३) आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहे. आता पर्यंत त्यांनी तीन झोनमध्ये काम केलं. या आधी त्या रेल्वे बोर्ड मध्ये ऑपरेशन आणि बिझनेस डेवलपमन्टें च्या पदावर होत्या.

जया वर्मा सिन्हा यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले आहे. त्या भारतीय रेल्वे सेवा १९८८ बॅचच्या आयआरटीएस अधिकारी आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या जागेवर सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयलक्ष्मी विश्वनाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या तर जया वर्मा-सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून उद्या पदभार स्वीकारतील.

जया वर्मा सिन्हा या ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी चर्चेत आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली हे संवेदनशील प्रकरण हाताळण्यात आले. त्यांनी या प्रकरणाचे पीएमओ कार्यालयाला पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले होते. त्यांची सक्रीयता आणि कार्यशैलीला खूपच पसंत केले होते. आता सरकारने त्यांनाच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.रेल्वे बोर्डाला केंद्र सरकारकडून रेल्वे अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये रेकॉर्डब्रेक २.४ लाख कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जया वर्मा-सिन्हा रेल्वे बोर्डाचा कार्यभार सांभाळणार आहेत. देशाच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट असलेल्या रेल्वेला पहिल्यांदा इतका निधी मिळाला आहे.


सम्बन्धित सामग्री