Saturday, July 06, 2024 11:51:42 PM

discussion-of-political-raksha-bandhan-in-maharashtra
महाराष्ट्रात राजकीय रक्षाबंधनाची चर्चा

महाराष्ट्रात राजकीय रक्षाबंधनाची चर्चा

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात रक्षाबंधन उत्साहात साजरे झाले. पण चर्चा राजकीय रक्षाबंधनाची होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुस्लिम मुलींनी राखी बांधली. पंकजा मुंडे यांनी माहुर गडावर रेणुका देवीचे दर्शन घेतले. नंतर पंकजा मुंडेंनी महादेव जानकर यांना राखी बांधली. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना राखी बांधली. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे संरक्षण करणाऱ्या रक्षकांना राखी बांधली तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना टपालाने राखी पाठवून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. अनेक महिलांनी शिर्डीत पुजाऱ्यांच्या हस्ते साईबाबांना राखी बांधली. https://www.youtube.com/watch?v=viVMAPbaIsE https://www.youtube.com/watch?v=su0S3XX6v_g विठ्ठलास बांधली राखी रक्षाबंधनाच्या बुधवारी सर्वत्र उत्साह असताना परंपरेप्रमाणे पंढरपुरात विठ्ठलास सोन्याची आणि हिऱ्याची राखी बांधण्यात आली. प्रतिवर्षी परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता विठोबास सुवर्ण अलंकार परिधान केले जातात. त्याचवेळी सोन्याची राखी विठ्ठलाच्या उजव्या हातात बांधली जाते. त्यानुसार यंदा सोन्याची राखी बांधण्यात आली. या राखीवर हिरे पण दिसत आहेत. सायंकाळनंतर विठ्ठलाच्या हातात बांधण्यात आलेली सोन्याची राखी पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. https://www.youtube.com/watch?v=agMl2vSeSgc https://www.youtube.com/watch?v=xRXDrEOsjtc https://www.youtube.com/watch?v=PNi6cZuxtcQ https://www.youtube.com/watch?v=sY2hrtv4aDk https://www.youtube.com/watch?v=izPZTQ-yebo https://www.youtube.com/watch?v=HZt6q3RQBlQ https://www.youtube.com/watch?v=qtU-B1X4dlY https://www.youtube.com/watch?v=_Dk-PFk4iPU नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी राज्यातील कोळी बांधवांनी परंपरागत पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. सागराला शांत होण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर कोळी बांधवांनी मासेमारीसाठी होड्या पाण्यात उतरवल्या.


सम्बन्धित सामग्री