Friday, July 05, 2024 12:50:22 AM

पुन्हा राऊत राणे आमनेसामने

पुन्हा राऊत राणे आमनेसामने

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. "नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस देसाईंना धमक्या देत होता," असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही नितेश राणेंनी गंभीर आरोप केले आहेत. 'ठाकरे' सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओमध्ये झालं होतं. त्याचे पैसे दिलेत का?" असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. "नितीन देसाई चांगले व्यक्ती होते. त्यांचा एन.डी स्टुडिओ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना हवा होता. त्यासाठी देसाईंवर दबाव टाकला जात होता.'मातोश्री'जवळच्या व्यक्तीकडून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. देसाई आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांच्याकडे सध्या चौकशी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. "सनी देओल त्यांचे कर्ज ते फेडू शकले नाहीत म्हणून त्यांच्या बंगल्यावर जप्तीची नोटीस आली होती. परंतु 24 तासात सूत्रे हलली. दिल्लीतून त्यांचा लिलाव थांबवला गेला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही? नितीन देसाई दिल्लीमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांना भेटले होते. त्यांचा स्टुडिओ वाचविला जावा यासाठी त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं होतं. माझं स्वप्न वाचवा असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांना वाचवले नाही. दिल्लीतून येऊन त्यांनी आत्महत्या केली," असा आरोप राऊतांनी केला आहे.


सम्बन्धित सामग्री