Thursday, July 04, 2024 10:34:22 AM

8-colleges-closed-in-solapur-district
सोलापूर जिल्ह्यातील ८ महाविद्यालये बंद

सोलापूर जिल्ह्यातील ८ महाविद्यालये बंद

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाविद्यालय शिक्षण घेताना अनेक हुशार विद्यार्थ्यांना कौटुंबिक परिस्थितीमुळे महागडे शिक्षण घेता येत नाही. अनेकांना शिक्षकाचे आकर्षण असते. त्यामुळे त्यांचा कल ‘बीएड’कडे होता. पण, आता जुनी पेन्शन योजना बंद, शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षे सेवेची अट, नोकरभरतीची प्रतीक्षा, नोकरीसाठी संस्थाचालकांना द्यावे लागणारे डोनेशन अशा प्रमुख कारणांमुळे बीएड महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत. विविध कारणांमुळे जिल्ह्यातील आठ महाविद्यालये बंद झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी २३ बीएड महाविद्यालये होती. डीएड कॉलेजचाही भाव वधारलेला होता. चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास लगचेच नोकरी मिळत होती. पण, आता ही पदवी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊनही टीईटी, टेट उत्तीर्ण होऊन पुन्हा नोकरीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे मागील विद्यार्थ्यांचे अनुभव पाहून आता बीएड, डीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. अनेकांनी बीएड, डीएड करूनही नोकरी मिळत नसल्याने पर्यायी रोजगार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांना विद्यार्थी मिळत नसल्याने महाविद्यालये बंद करावी लागली आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार बीएड, डीएड महाविद्यालयांमध्ये बदल होणार आहे. सध्या चालू महाविद्यालयांचे क्लस्टर तयार करून दोन वर्षांचे बीएड, डीएड आता चार वर्षांचे होणार असून त्यात विद्यार्थ्यास पदवीसह बीएड, डीएडचे प्रमाणपत्र मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री