Tuesday, July 09, 2024 01:46:12 AM

outbreak-of-lumpy-disease-increased-one-animal-died
लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला, एका जनावराचा मृत्यू.

लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला  एका जनावराचा मृत्यू

लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला, एका जनावराचा मृत्यू.  धुळे, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. लंपी हा जनावरांच्या त्वचेला होणारा आजार आहे. यामुळे जनावरांचे प्राणही जाऊ शकते. माघील काही काळात लंपीची साथ मोठ्या प्रमाणावर जनावरांमध्ये पसरली होती. त्यानंतर आता पुन्हा धुळे जिल्यामध्ये लंपी आजाराने बाधित असलेले  ८८ जनावरे आढळून आले आहे. जिल्ह्यामध्ये ८८ जनावरांवर लंपीचा उपचार सुरू आहे. त्यापैकी १२ जनावरांना बरं वाटत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे. जिल्ह्यात साडेतीन लाखापेक्षा अधिक जनावरांचं लसीकरण पूर्ण झालेल आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हे लसीकरण पूर्ण झालेलं असलं, तरी अद्यापही काही जनावरे लंपी आजाराने बाधित आहेत. लंपीची जनावर आढळून येत असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संदर्भात यंत्रणा खूप माहिती द्यायला तयार नसली, तरी जनजागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे.

           

सम्बन्धित सामग्री