Saturday, October 05, 2024 03:19:25 PM

amit-thackerays-prank-on-aditya-thackeray
आदित्य ठाकरेंना अमित ठाकरेंचा खोचक टोला

आदित्य ठाकरेंना अमित ठाकरेंचा खोचक टोला

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाने अचानकपणे गुरुवारी रात्री उशिरा परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असून राजकीय वातावरण तापले आहेत. ठाकरे गट आणि मनसे उभे ठाकले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका भीती वाटत असल्यानेच पुढे ढकलल्या आहेत. तसेच आम्ही निवडणुकांसाठी १०० टक्के तयार आहे. पण निवडणुका पुढे ढकलणे हा काही पर्याय नाही. निवडणुका पुढे ढकलणे हा हुकुमशाही पध्दतीचा निर्णय आहे, असा हल्लाबोल मनसे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्यातील शिंदे - फडणवीस - पवार सरकारवर केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरुन चांगलेच ताशेरे ओढले. ठाकरे म्हणाले, राज्य सरकारच्या हातातच विद्यार्थ्यांचं भविष्य आहे आणि हेच आता निवडणुका पुढे ढकलण्याबाबत स्पष्टीकरण देत नाही. त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे. अनेक प्रश्न या निवडणुकांवर अवलंबून आहे. या सिनेटमध्ये नोंदणी बोगस झाली हे आपण मान्य करू. ती बोगस नोंदणी बाहेर काढायला किती दिवस पाहिजे हे तुम्ही सांगा ना असेही ते यावेळी म्हणाले. अमित ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे गेल्यात हे मान्य करायला लागेल. पण आता निवडणुका कधी घेणार हे स्पष्ट करा. तुम्ही २० दिवसांत बोगस नोंदणी बाहेर काढा. आपण एक महिन्यात निवडणुका लावू असेही ते यावेळी म्हणाले. निवडणुकीच्यावेळी हे बिळात लपून बसतात.आणि अशी स्थगिती वगैरे मिळाली की बाहेर पडतात असा हल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला. सर्व पक्ष एकत्र येऊ आणि निवडणुका लावू. लोकं ठरवतील काय करायचे असेही अमित ठाकरेंनी यावेळी सांगितले. स्थगिती मिळाल्यावर काय बोलताय असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरेंना केला.


सम्बन्धित सामग्री