Sunday, July 07, 2024 12:15:27 AM

sharad-pawar-on-mi-punha-yein
शरद पवारांनी घेतला 'पुन्हा येईन'चा धसका

शरद पवारांनी घेतला पुन्हा येईनचा धसका

बीड, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याचा धसका घेतला असल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' असे म्हटले त्याला ४ वर्ष झाली तरी शरद पवारांच्या डोक्यातून फडणवीस यांचे ते शब्द गेलेले दिसत नाहीत. बीडच्या राष्ट्रवादीच्या सभेत ही बाब पुन्हा दिसून आली. https://youtu.be/1tTOquUEhjc पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा येईन असं सांगितलं, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते ते पण असंच म्हणत होते. माझं मोदींना सांगणं आहे की, पुन्हा येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, असं शरद पवार म्हणाले. https://youtu.be/WrZg9yFJdio मी पुन्हा येईन हे नक्की काय प्रकरण आहे? पाहुयात, देवेंद्र फडणवीस यांनी २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन अशी घोषणा केली. फडणवीस त्यावेळी भाजपा – शिवसेना युतीचे भावी मुख्यमंत्री म्हणून निश्चित होते. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेला प्रतिसाद देत जनतेने भाजपा – शिवसेना युतीला १६५ जागा निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेने इतके सुस्पष्ट बहुमत यापूर्वी कधीच कोणत्याही युतीला दिले नव्हते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांच्या काळातही भाजपा शिवसेना युतीला बहुमत नव्हते. फडणवीसांच्या घोषणेमुळे भाजपा – शिवसेनेची युती सत्तेत येणार असतानाच घात झाला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपाची साथ सोडून काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत घरोबा केला. उद्धव ठाकरेंमुळे जनतेने निवडून दिलेले भाजपा शिवसेनेचे बहुमतात सरकार अस्तित्वात आले नाही.


सम्बन्धित सामग्री