३ जून २०२४, प्रतिनिधी : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसण्याचे चित्र दिसून येत आहे . मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. पण ते जरांगे पाटील यांना मान्य नसून, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी त्यांनी आता पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारले आहे.