Wednesday, April 09, 2025 06:15:31 AM

रस्तेकामांसाठी १० जूनची अंतिम मुदत

रस्तेकामांसाठी १० जूनची मुदतपावसाळ्याआधी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश

रस्तेकामांसाठी १० जूनची अंतिम मुदत
mumbai road

मुंबई - शहर आणि उपनगरात सुरू असलेली रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना आता १० जूनची अंतिम मुदत दिली आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर रस्ता रोधक (बॅरिकेड्स), बांधकाम साहित्य दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी, पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते वाहतूक योग्य करावे, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. संपूर्ण पावसाळ्यात कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकाम करण्याची परवानगी देता येणार नाही. केवळ वीज, गॅस, पाणी यांसारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी गरजेनुसारच रस्ते खोदकामाची परवानगी देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
 

महत्त्वाचे मुद्दे - 

रस्तेकामांसाठी १० जूनची मुदत
पावसाळ्याआधी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश


सम्बन्धित सामग्री