Monday, September 16, 2024 02:02:41 PM

Traffic Alert
वाहतूक कोंडीचं विघ्न

गणेशोत्सवासाठी कोकणात जात असलेल्या भक्तांमुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचं विघ्न निर्माण झालं आहे.

वाहतूक कोंडीचं विघ्न

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जात असलेल्या भक्तांमुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचं विघ्न निर्माण झालं आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झालेली आहे. वडखळ ते कासू, कोलाड, लोणेरे येथे वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे अनेकांना गावी पोहोचण्यासाठी एरवीच्या तुलनेत दोन - चार तास अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत. हजारो वाहने अडकली आहेत. रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

मुंबई -पुणे यशवंतराव चव्हाण महामार्गावर वाहतूक कोंडी 

मुंबई -पुणे यशवंतराव चव्हाण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. बोरघाट पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नाशिकमध्ये बाप्पाच्या आगमनाला सुरुवात

संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. सुख, शांती, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाचे शुक्रवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला आगमन होत आहे. नाशिकच्या सरदार चौक मित्र मंडळाचा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला. ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं आगमन झालं आहे.  भव्य देखावे आणि सूचक संदेश हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.  बाप्पांच्या आगमन सोहळ्यात पारंपारिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या. शतक महोत्सवी वर्षानिमित्त सरदार चौक मित्र मंडळाच्यावतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

डोंबिवलीच्या गणेश मंदिराचा गणेशोत्सव

डोंबिवली शहरातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी ख्याती असलेल्या गणेशोत्सवाची सुरुवात श्री गणेश मंदिर संस्थानात सन १९२५ पासून झाली स्थापनेच्या काळात मंडळातील अनेक कार्यकर्ते हे वारकरी संप्रदायाचे असल्याने श्रींचे विसर्जन हे भागवत एकादशीला करण्याची प्रथा आजही सुरू आहे स्वातंत्र्योत्तर काळात जसजशी लोक वस्ती वाढत गेली शहराचा विस्तार झाला परंतु मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह डोंबिवलीकरांची श्रद्धा आणि प्रेम कधीच कमी झालेल नाही. सात सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मंडळाचा १०० वा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात धार्मिक आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे. 


सम्बन्धित सामग्री