मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील हवेचा निर्देशांक धोकादायक स्तरावर गेला आहे. चांगल्या हवेचा निर्देशांक 0 ते 50 असणे आवश्यक असताना मुंबईतील काही भागातील निर्देशांक 200 च्या वर गेला आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेने रस्त्यांवर पाणी फवारणी सुरू केली आहे. तसेच अँटी स्मॉग गनचा वापर करून वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा : धस यांनी माझी माफी मागावी; प्राजक्ताने सोडले मौन
मुंबईतील हवेचा स्तर खालावला आहे. त्यामुळे वायुप्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून पाणी फवारणी करण्यात येत आहे. मुंबई पालिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.