मुंबई : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल आहेत. रतन टाटा हे ८६ वर्षांचे आहेत. यामुळे ते रुग्णालयात दाखल होताच त्यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरण्यास सुरुवात झाली. अखेर रतन टाटा यांनी ट्वीट करुन स्वतःच्या तब्येतीची माहिती दिली.