Sunday, September 08, 2024 08:49:03 AM

RAIN UPDATE
मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूमध्येही जोरदार पाऊस पडत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूमध्येही जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी तसेच नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या दणक्यामुळे मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहे. रस्ते वाहतूक मंदावली आहे. 

           

सम्बन्धित सामग्री