Sunday, September 08, 2024 08:47:39 AM

Rain Update
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला पावसाने दणका दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. विदर्भातील काही भागात पावसाने दणका दिला आहे.

मुंबई ठाणे पुणे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

मुंबई : संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला पावसाने दणका दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. विदर्भातील काही भागात पावसाने दणका दिला आहे. 

बुधवार रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पश्चिम, मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्ग येथील गाड्या दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेल्या भागात मदतकार्य सुरू आहे. पंप लावून पाणी उपसण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. 

पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तुळशी, तानसा आणि विहार हे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत. 

पावसामुळे रेल्वे वाहतूक मंदावली
मध्य रेल्वे २० मिनिटे, पश्चिम रेल्वे १० मिनिटे उशिराने
सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली

विहार तलाव ओसंडून वाहू लागला
तुळशी तलाव २० जुलै रोजी भरला
तानसा तलाव २४ जुलै रोजी भरला
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी तीन तलाव भरले

विहार तलाव मध्यरात्री ३.५० वाजता ओसंडून वाहू लागला
विहारची पाणी साठवण्याची क्षमता २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर
तानसा तलाव २४ जुलैच्या संध्याकाळी ४.१६ वाजता ओसंडून वाहू लागला
तानसाची पाणी साठवण्याची क्षमता १४ हजार ५०८ कोटी लिटर
तुळशी तलाव २० जुलैच्या सकाळी ८.३० वाजता ओसंडून वाहू लागला
तुळशीची पाणी साठवण्याची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर

पुण्यात रात्रभर तुफान पाऊस
पुण्यासह पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा, महाविद्यालये बंद
हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

ताम्हिणी घाटात दरड कोसळली
पुणे - कोलाड महामार्ग बंद

पुण्यात विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू 
पुलाची वाडी येथील घटना 
गुडघाभर पाण्यातून जाताना विजेचा धक्का

दारणा धरण ७८ टक्के भरलं, विसर्ग वाढवला 
धरणातून ३,७४६ क्यूसेकने विसर्ग
दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोकणात मुसळधार पाऊस 
मिर्‍या बंधार्‍याला भगदाड

नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पाऊस
भाजी मंडईत साचले पाणी

पुणे - भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली
वाहतुकीचा खोळंबा, दरड काढण्याचे काम सुरू

कोल्हापुरात पूरस्थिती, पंचगंगेने गाठली धोक्याची पातळी
पंचगंगेची पाणी पातळी पोहोचली ४३ फुटांवर
राधानगरी धरण ९८ टक्क्यांपेक्षा जास्त भरलं

नाशिकचे पाणी कपातीचे संकट टळले
गंगापूरसह इतर धरणांमध्ये पाणीसाठा वाढला

वर्ध्यात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस 
कारंजा घाडगे तालुक्यात शेतात शिरले पुराचे पाणी

चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार 
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
कंबरभर पाण्यातून विद्यार्थ्यांनी ओलांडला पूल


सम्बन्धित सामग्री