मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना! 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी या दिवशी मुंबईतील काही भागांचा पाणीपुरवठा 30 तासांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान तानसा पूर्व आणि पश्चिम या दोन महत्त्वाच्या जलवाहिन्या तात्पुरत्या खंडित केल्या जातील. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
या नियोजित दुरुस्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेने विमानतळ प्रशासनाला याबाबत आधीच कल्पना दिली असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही काळ गढूळ पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे, असा सल्ला महापालिकेने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
महापालिकेच्या या महत्त्वाच्या जलवाहिनी कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असण्याच्या काळात सर्वांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा आणि अनावश्यक वापर टाळावा.
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर!