Tuesday, September 17, 2024 08:59:49 AM

Electricity
दोन हजार मेगावॅट वीज मुंबईला मिळणार

मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडकडून पडघा-पनवेल पॉवर ट्रान्समिशन कॉरिडॉर प्रकल्प उभारला जात आहे.

दोन हजार मेगावॅट वीज मुंबईला मिळणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाची विजेची गरज भागविण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडकडून पडघा-पनवेल पॉवर ट्रान्समिशन कॉरिडॉर प्रकल्प उभारला जात आहे. याद्वारे अतिरिक्त २ हजार मेगावॅट वीज वाहून आणली जाणार आहे. राजस्थानसह गुजरातमध्ये निर्माण होणारी हरित ऊर्जा या नव्या वीज वाहिनीद्वारे मुंबई महानगर प्रदेशात वाहून आणली जाईल. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची विजेची गरज भागवितानाच अतिरिक्त विजेमुळे विजेचे दर कमी होतील, असा दावा मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडने केला आहे.


सम्बन्धित सामग्री