Sunday, December 22, 2024 11:52:04 AM

Metro 3
पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांचे सेवेत

पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांचे सेवेत आली आहे. सोमवारी सकाळी ११ वा. मेट्रो ३ अर्थात अॅक्वा मार्गाची सेवा सुरू झाली. मेट्रो ३ ची सेवा मंगळवारपासून सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.

पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांचे सेवेत

मुंबई : पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांचे सेवेत आली आहे. सोमवारी सकाळी ११ वा. मेट्रो ३ अर्थात अॅक्वा मार्गाची सेवा सुरू झाली. मेट्रो ३ ची सेवा मंगळवारपासून सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. 

आरे ते बीकेसी हा प्रवास रस्त्यावरुन बेस्टच्या बसने एक ते दीड तासात करता येतो. या प्रवासात अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याउलट आरे कारशेड ते बीकेसी हा प्रवास मेट्रोतून अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

मेट्रो ३ या मार्गिकेची एकूण लांबी ३३.५० किमी. आहे. तर आरे कारशेड ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेची लांबी १२.६९ किमी. आहे. या टप्प्यात दहा स्थानके आहेत. ताशी ९५ किमी. वेगाने ही मेट्रो धावणार आहे. आरे ते बीकेसी हा प्रवास मेट्रो ३ मुळे अवघ्या बावीस मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

मेट्रो ३ कामकाजाच्या दिवशी सकाळी ६.३० ते रात्री १०.३०
मेट्रो ३ सुटीच्या दिवशी सकाळी ८.३० ते रात्री १०.३०
कामकाजाच्या दिवशी मेट्रो ३ च्या दिवसभरात ९६ फेऱ्या होतील
दर ६ मिनिटे ४० सेकंदांनी मेट्रो सोडली जाईल. किमान १० रुपये ते कमाल ५० रुपये तिकीट दर असेल
मेट्रो ३ ची पूर्ण मार्गिका सुरू झाल्यावर तिकिटांच्या दरांमध्ये बदलाची शक्यता
मेट्रो ३ ची मार्गिका मरोळ येथे मेट्रो १ च्या मार्गिकेशी जोडली आहे
मेट्रो ७ अ आणि मेट्रो ३ मार्गिकेचे विमानतळ स्थानक एकाच ठिकाणी 
आरे स्थानकाच्या समोरच मेट्रो ६ मार्गिकचे सीप्झ गाव हे स्थानक

आरे कॉलनी, जेव्हीएलआर - सीप्झ - अंधेरी - मरोळ नाका - आंतरराष्ट्रीय विमानतळ T2, अंधेरी - सहार रोड - सांताक्रुझ विमानतळ T 1 - सांताक्रुझ - वांद्रे वसाहत - वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी)

वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) - वांद्रे वसाहत - सांताक्रुझ - सांताक्रुझ विमानतळ T 1 - सहार रोड - आंतरराष्ट्रीय विमानतळ T2, अंधेरी - मरोळ नाका - अंधेरी - सीप्झ - आरे कॉलनी, जेव्हीएलआर
 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo