Thursday, September 19, 2024 04:56:32 AM

Chandrakant Patil
मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला दिल्या सूचना

कौशल्य निर्मितीवर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.


मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला दिल्या सूचना

मुंबई :  मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे स्वायत्त विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात आदिवासी भागात कौशल्य निर्मितीवर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. बुधवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूर विद्यापीठ संदर्भात ऑनलाईन बैठक पार पडली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नँक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तसेच विद्यापीठाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क तर्फे प्रकाशित होणाऱ्या अहवालात विद्यापीठाचा नंबर असावा यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर इतर राज्यात शैक्षणिक शाखा सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्या,आणि  सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा. राज्य शासन याबाबत सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री