Saturday, August 24, 2024 12:58:29 PM

mihir shah udicial custody
मिहीर शाहला न्यायालयीन कोठडी

मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी, १६ जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आ

मिहीर शाहला न्यायालयीन कोठडी 
mihir shah custody

१६ जुलै, २०२४ मुंबई : मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी, १६ जुलै रोजी शिवडी न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी शिवडी न्यायालयाने मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी पालघरचे शिवसेना उपनेता राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली होती. तर, यातील मुख्य आरोपी असलेला राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह फरार होता. तब्बल ६० तासानंतर मिहीर शाह याला शहापूर येथून अटक करण्यात आली होती. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात अली होती. 
रविवारी, ७ जुलै रोजी पहाटे वरळीत मद्यधुंद अवस्थेतील मिहीर शाह याने प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या दाम्पत्याला उडवले होते. या अपघातात प्रदीप नाखवा जखमी झाले. तर त्यांची पत्नी कावेरी हिला बीएमडब्ल्यू कारनं सुमारे शंभर मीटरपर्यंत फरफडत नेलं. त्यामुळं कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. 


सम्बन्धित सामग्री