Saturday, September 28, 2024 05:45:44 PM

Mhada houses became cheaper
म्हाडाची घरं झाली स्वस्त

म्हाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाची घरं झाली स्वस्त


मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळणारी घरे महाग असल्याने टीका होत होती. तर दुसरीकडे मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४च्या सोडतीतील घरांना प्रतिसादही मिळत नव्हता. या बाबी लक्षात घेता अखेर म्हाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सप्टेंबर २०२४ च्या सोडतीपासून लागू करण्यात आला आहे. तसेच आता अर्ज करण्यासाठी देखील १९ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.   

 

विविध गटातील घरांच्या किंमती किती टक्के कमी होणार? 
 

अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत २५ टक्के कमी होणार 
अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत २० टक्के कमी होणार 
मध्यम उत्पन्न गटातील घरांची किंमत १५ टक्के कमी होणार 
उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत १० टक्के कमी होणार 
 


सम्बन्धित सामग्री