Sunday, September 08, 2024 07:19:52 AM

Mumbai
मुंबईला पाणीपुरवठा करणारे ३ तलाव भरले

पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तुळशी, तानसा आणि विहार हे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे ३ तलाव भरले

मुंबई : पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तुळशी, तानसा आणि विहार हे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहेत. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आणि त्यांची पाणी साठवण्याची क्षमता

मुंबईला दररोज होणारा पाणी पुरवठा - ३८०० दशलक्ष लिटर

  1. भातसा - ७,१७,०३७ दशलक्ष लिटर - ४,५९,५३९ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  2. अप्पर वैतरणा - २,२७,०४७ दशलक्ष लिटर - ७७,४८४ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  3. मध्य वैतरणा - १,९३,५३० दशलक्ष लिटर - १,२२,५४९ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  4. मोडकसागर - १२८९२५ दशलक्ष लिटर - १,२७,१९२ दशलक्ष लिटर सध्याचा पाणीसाठा
  5. तानसा - १,४५,०८० दशलक्ष लिटर - पूर्ण भरला
  6. विहार - २७,६९८ दशलक्ष लिटर - पूर्ण भरला
  7. तुळशी - ८,०४६ दशलक्ष लिटर - पूर्ण भरला

विहार तलाव ओसंडून वाहू लागला
तुळशी तलाव २० जुलै रोजी भरला
तानसा तलाव २४ जुलै रोजी भरला
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी तीन तलाव भरले

विहार तलाव मध्यरात्री ३.५० वाजता ओसंडून वाहू लागला
विहारची पाणी साठवण्याची क्षमता २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर
तानसा तलाव २४ जुलैच्या संध्याकाळी ४.१६ वाजता ओसंडून वाहू लागला
तानसाची पाणी साठवण्याची क्षमता १४ हजार ५०८ कोटी लिटर
तुळशी तलाव २० जुलैच्या सकाळी ८.३० वाजता ओसंडून वाहू लागला
तुळशीची पाणी साठवण्याची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर


सम्बन्धित सामग्री