Monday, September 16, 2024 02:08:55 PM

Rain Update
राज्यातील मोठी धरणे भरली

राज्यात सहा वर्षांनंतर प्रथमच मोठी धरणे भरली आहेत. सर्व मोठ्या धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.

राज्यातील मोठी धरणे भरली

मुंबई : राज्यात सहा वर्षांनंतर प्रथमच मोठी धरणे भरली आहेत. सर्व मोठ्या धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणे भरल्याने यंदा पाणीबाणी होणार नाही. 

राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर तब्बल सहा वर्षांनी यंदा प्रथमच शंभर टक्के भरली आहेत. उजनी, कोयना, जायकवाडी, त्याचप्रमाणे भातसा आणि वैतरणा ही धरणे १०० टक्क्यांनी भरल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. गेल्या वर्षी याच सुमारास सुमारे ६५ टक्के पाणीसाठा या धरणांमध्ये होता. राज्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस झाला असून १०२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. 

नाशिकच्या तीन धरणांतून विसर्ग सुरू
गंगापूर धरणातून २२०० घनमीटर विसर्ग
दारणा धरणातून २८०० घनमीटर विसर्ग
करंजवण धरणातून २४०० घनमीटर विसर्ग

पुण्यात खडकवासलातून मोठ्या प्रमाणात विसर्ग
नदीचं पाणी रस्त्यावर, नागरिकांची तारांबळ

पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर भिडे पूल रात्री पाण्याखाली गेला होता. पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर पुलावरील पाणी ओसरले. खबरदारीचा उपाय म्हणून आणखी काही तास भिडे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  


सम्बन्धित सामग्री