Friday, September 20, 2024 12:26:06 AM

footbridge conditions worst
चर्नी रोड येथील पादचारी पुलाची दुरावस्था

एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे आहेत की खडयांमध्ये रस्ते हे समजणं सध्या कठीण झालं आहे. तर, दुसरीकडे मुंबईत रेल्वे स्थानकांना लागून असलेल्या पादचारी पुलांची देखील तशीच परिस्थिती आहे.

चर्नी रोड येथील पादचारी पुलाची दुरावस्था 

५ ऑगस्ट, २०२४, मुंबई : एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे आहेत की खडयांमध्ये रस्ते हे समजणं सध्या कठीण झालं आहे. तर, दुसरीकडे मुंबईत रेल्वे स्थानकांना लागून असलेल्या पादचारी पुलांची देखील तशीच परिस्थिती आहे. याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. 
चर्नी रोड स्थानकाच्या पूर्वेकडून जाणाऱ्या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात लाद्या तुटल्या आहेत आणि सर्व सामान्य प्रवाश्यांना या पुलावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. 
स्टेशनला लागूनच नव्याने बांधलेल्या पादचारी पुलावरील बहुतेक लाद्या तुटल्या आहेत. यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. लादयनाचे तुटलेले तुकडे पुलाच्या काठावर पडलेले आहेत. हा पादचारी पूल २०१९ मध्ये केलेल्या ऑडिटमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी धोकादायक घोषित करण्यात आलेल्या आठ पुलांपैकी एक होता. हा पूल २०२१ मध्ये पुन्हा बांधण्यात आला मात्र, सध्या या पुलाची परिस्थिती खूप वाईट आहे. याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. 


सम्बन्धित सामग्री