मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकाने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी प्रमाणात पाणी येत आहे. परिणामी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गोरेगावमधील येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. गोरेगाव पश्चिमेतील आझाद मैदानासमोरील सनराईज टॉवर गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांना मागील महिनाभरापासून कमी पाणी येत आहे. त्यामुळे या सोसायटीतील रहिवासी त्रस्त आहेत. याप्रकरणी पालिकेच्या 'पी दक्षिण' विभागाच्या जलअभियंत्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.