Thursday, December 26, 2024 09:08:20 PM

Megablock
महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक


मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन वेळापत्रक पाहून करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान धिम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे सेवा १५ मिनिटांच्या उशिराने धावतील. 


सम्बन्धित सामग्री