मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत संपादक आशुतोष पाटील यांनी घेतली. आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याचे सांगितले असून, भाजपावर विविध आरोप केले आहेत. आदित्य म्हणाले, "आजची भाजपाची भूमिका महाराष्ट्रद्वेषी आहे," आणि "जे भ्रष्टाचारी, ते भाजपासोबत आहेत." याशिवाय त्यांनी भाजपच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या गद्दारीला माफी नाही असे स्पष्टपणे सांगितले.
आदित्य यांनी भाजपावर आरोप केला की, "भाजपाला मुंबई आणि गुजरातला जोडायचं आहे" आणि "भाजप ने हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही." त्याचप्रमाणे, "४० चोरांनी पक्ष, चिन्ह चोरलं," असंही त्यांनी म्हटलं. तसेच "भाजपकडून शिवरायांच्या पुतळ्यात घोटाळा होत आहे," अशा आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला.
"बंटेंगे तो कटेंगे" ह्या शब्दांद्वारे भाजपाच्या राजकारणावर टीका केली असून, "लहान आहे ना मी, बच्चे से क्या डरना" असे म्हणत, आपला आत्मविश्वास दर्शवला. आदित्य ठाकरे यांनी चुकलेले आरोप, अदानी प्रकरणातील संदर्भ तसेच मुंबईविरोधी कार्यक्षमतेवर देखील भाष्य केले आहे.