Saturday, September 28, 2024 07:47:17 PM

BJP is targeting Mumbai
विदर्भ, मराठवाड्यानंतर आता भाजपाचे मुंबईवर लक्ष्य

विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजपाचे आता मुंबईवर लक्ष्य आहे. 'मिशन मुंबई'साठी अमित शाह यांनी विशेष रणनीती आखली आहे.

विदर्भ मराठवाड्यानंतर आता भाजपाचे मुंबईवर लक्ष्य

२७ सप्टेंबर, २०२४, मुंबई : विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजपाचे आता मुंबईवर लक्ष्य आहे. 'मिशन मुंबई'साठी अमित शाह यांनी विशेष रणनीती आखली आहे. विधानसभेच्या मुंबईतील ३६ जागांसाठी भाजपाचे मुंबईवर विशेष लक्ष्य आहे. अमित शाह स्वतः धोकादायक मतदारसंघाचा स्वंतत्र आढावा घेणार आहेत.अमित शाह मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी स्वत: संवाद साधून सद्यस्थिती समजून घेणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना भाजपाकडून आदेश देण्यात आले आहेत.  मुंबईच्या प्रत्येक विधासभा मतदारसंघाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 
 घटस्थापनेनंतर अंतिम जागावाटप यादी जाहीर केली जाईल. 
 
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची काही गणिते चुकल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आता विधानसभेसाठी भाजपाने निवडणूक रणनितीत कोणताही कसर न ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात अधिकाधिक जागा महायुतीच्या जिंकून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. अलिकडेच अमित शाह यांनी विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकचा दौरा करून तेथील सद्यस्थितीचा राजकीय आढावा घेतला. पुढील टप्प्यात शाह यांचा मुंबई दौरा होणार असून त्यात ते मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विधानसभा जागांचा आढावा घेवून त्याची रणनिती ठरवणार आहेत. महायुतीतत कोणाच्या किती जागा यापेक्षा महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून आणणे याला महत्व दिलं जाणार आहे. अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असून ते भाजपा नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच, या दौऱ्यात महायुतीच्या नेत्यांशाही चर्चा करणार आहेत. घटस्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतच्या यादीला अंतिम स्वरूप येणार असल्याची माहिती भाजपाच्या नेत्यांनी दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री