नवी दिल्ली : सोन्याचे दागिने परिधान करणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे सोन्याविषयी महिलांमध्ये एक वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे महिलांकडून जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र सोन्याच्या दरात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.
इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:50 वाजता भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 86,140 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच एका तोळ्याचा दर 86 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. नवी दिल्लीत सोन्याचा दर 85,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबईत गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळा 85,980 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये दर 85,870 रुपये आहे, तर बेंगळुरूमध्ये दर 86,050 रुपयांच्या पुढे गेला, असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. 86,230 रुपयांच्या किमतीसह, चेन्नईमध्ये देशातील सर्वाधिक सोन्याचा दर दिसून येत आहे.
हेही वाचा : साताऱ्यातील लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज; पालकांना मिळेना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा
या आठवड्यात मंगळवारी सोन्याच्या किमती 250 रुपयांनी वाढून 89,350 रुपये प्रति तोळा झाला आहे. ज्यामुळे रुपयाच्या घसरणीमुळे दुसऱ्या दिवशीही त्यात वाढ झाली, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले आहे. 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 250 रुपयांनी वाढून 88,950 रुपये प्रति तोळा झाले.
20 फेब्रुवारी रोजी, 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे 89 हजार 450 रुपये आणि 89 हजार 050 रुपये प्रति तोळा या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. मंगळवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 51 पैशांनी घसरला. आयातदारांकडून महिन्याच्या अखेरीस डॉलरची मागणी वाढल्याने ही घसरण झाली, ज्याला अमेरिकेच्या व्यापार शुल्कावरील अनिश्चिततेमुळे आणखी पाठिंबा मिळाला.
जागतिक आणि फ्युचर्स दर
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, जागतिक स्तरावर सोन्याचे दर $2,914 डॉलरवर पोहोचले. ट्रम्पच्या टॅरिफबद्दलच्या तणावामुळे जागतिक दर उच्चांकावर पोहोचले आहेत. जे इतर जागतिक संकेतांमुळे वाढले आहे.
हेही वाचा : Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती
चांदीचे दर
इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, सकाळी 6:50वाजता चांदीचा दर 95,260 रुपये होता. अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांदीचे महत्त्व लक्षात घेता, त्याची औद्योगिक मागणी वाढत असल्याने, या वाढीला चालना मिळाली आहे.