Sunday, June 30, 2024 10:10:30 AM

64 lepers were found in Panvel
पनवेलमध्ये आढळले ६४ कुष्ठरुग्ण

पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एकूण कुष्ठरुग्णांची संख्या ६४ आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती पंचायत समिती, आरोग्य विभाग पनवेल यांच्याकडून देण्यात आली.

पनवेलमध्ये आढळले ६४ कुष्ठरुग्ण

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एकूण कुष्ठरुग्णांची संख्या ६४ आहे. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती पंचायत समिती, आरोग्य विभाग पनवेल यांच्याकडून देण्यात आली. कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी लवकर निदान योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्वचेवर खाजवणारा बधिर चट्टा आल्यास किंवा हातापायास मुंग्या, बधिरपणा आल्यास किंवा त्वचा लालसर चमकदार दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. रोगाचे निदान झाले तरी घाबरण्याचे कारण नसते. यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत पनवेलच्या ग्रामीण भागात एकूण १० कुष्ठरुग्ण सापडून आले. त्यापैकी सद्यस्थितीत ६४ रुग्ण आहेत.


सम्बन्धित सामग्री