Saturday, September 28, 2024 10:32:30 PM

महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल

महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल

मुंबई , २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात एक नवीन सूचना जारी केली आहे. यामुळे दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १ मे २०२४ रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त परेड आयोजित केली जात आहे. परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी ६.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीस कुठे प्रवेश बंद ?

१. एन. सी. केळकर मार्ग व एल. जे. रोड जंक्शन पासुन (गडकरी जंक्शनपासून) केळूस्कर मार्ग, दक्षिण व उत्तर जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

२. केळूस्कर मार्ग दक्षिण, पूर्वेकडील वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील म्हणजेच या मार्गावर स्वातंत्रवीर सावरकर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश मिळेल.

३. मीनाताई ठाकरे पुतळा येथून उजवे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर हा पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील.

४. एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील,

५. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन पर्चत वाहतूकीस बंद राहील.

६. सिध्दीविनायक जंक्शन येथून स्वातंत्रवीर सावकर मार्गे पश्चिम उपनगराकडे जावू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी सिध्दीविनायक जंक्शन येथे उजवे वळण घेवून, एस. के. बोले रोडने पोर्तुगिज चर्च जंक्शन येथे डावे वळण घेवून गोखले रोड मार्गे गडकरी जंक्शन, एल. जे. रोड, राजा बडे चौक येथून पश्चिम उपनगराकडे प्रस्थान करतील.

७ येस बँक जंक्शन चेथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत प्रवेश बंद केल्याने, दक्षिण मुंबईकडे जावू इच्छिणारे वाहन चालक हे त्यांची वाहने एस. व्ही. एस. रोडने येस बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क रोड नं. ५ म्हणजे पांडूरंग नाईक मार्गे राजा बडे चौक येथे आलेनंतर उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गडकरी जंक्शन मार्गे गोखले रोड मार्गाने दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करतील.


सम्बन्धित सामग्री