Wednesday, April 16, 2025 09:42:51 PM

मुजोर रिक्षाचालकांना दणका

मुजोर रिक्षाचालकांना दणका

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रेल्वे स्थानके, मॉल, बसस्थानके व इतर ठिकाणी जवळचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३,२६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक नजीकचे भाडे नाकारतात. अशा अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे वेगवेगळ्या माध्यमातून येत होत्या. त्याचबरोबर चालक गणवेश परिधान करीत नाहीत, बॅच तसेच इतर कागदपत्रे बाळगत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात अशाही तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत बेशिस्तचालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८ एप्रिल ते २२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली.


सम्बन्धित सामग्री