Tuesday, July 02, 2024 09:12:38 AM

सी-लिंकवरुन आता थेट दक्षिण मुंबईत प्रवेश

सी-लिंकवरुन आता थेट दक्षिण मुंबईत प्रवेश

मुंबई, प्रतिनिधी, दि. २५ एप्रिल २०२४ : कोस्टल रोड आता सी लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोस्टल रोडवरून थेट वरळी सीलिंकवर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडी देखील कमी होणार असल्याची शक्यता आहे. या पुलाचे काम सध्या चांगलेच वेगाने सुरू आहे. आणि येत्या दोन ते तीन दिवसात गर्डर बसवण्याच काम पूर्ण होणार आहे. बोर गार्डन हा संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर पुढील 100 वर्षे टिकेल इतका मजबूत केला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील भरती आणि आहोटीच्या वेळा पाहूनच ही सगळी कामे करण्यात येणार आहेत. 336 मीटर एवढा लांब असलेल्या या गर्डरमुळे आता कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

'बो आर्क गर्डर'ची वैशिष्ट्ये
२००० मेट्रिक टनचा गर्डर.
संपुर्ण गर्डर जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग केले आहे.
पुढील २५ ते ३० वर्ष गंज पकडणार नाही.
पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत गर्डर आहे.
माझगाव डाॅक येथे गर्डरची बांधणी.


सम्बन्धित सामग्री