Friday, July 05, 2024 02:59:56 AM

धनुर्वाताच्या इंजेक्शनचा तुटवडा

धनुर्वाताच्या इंजेक्शनचा तुटवडा

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : अकरा हजार कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या पुणे महापालिकेच्या रुग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नाही. गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून हे इंजेक्शनच आलेले नाहीत. शासन पुरवठा करत असलेले इंजेक्शन खरेदी करता येत नाही, असे कारण देत महापालिकेनेही या इंजेक्शनची खरेदीच केलेली नाही. महापालिकेकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी शहरात दवाखाने तसेच रुग्णालये चालविली जातात. या ठिकाणी प्रामुख्याने कामगार तसेच कष्टकऱ्यांसाठी नाममात्र दरातील ही वैद्यकीय सेवा महत्त्वाची ठरते. राज्य शासनाकडून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अनेक इंजेक्शन तसेच औषधांचा पुरवठा महापालिकेस केला जातो. त्यात, घटसर्प तसेच धनुर्वाताचे एकत्रित इंज़ेक्शन पुरविले जाते. मात्र, शासनाकडून गेल्या सहा महिन्यांपासून अनेक औषधांचा नियमित पुरवठा होत नाही त्यात धनुर्वाताच्या इंजेक्शनचाही समावेश आहे.


सम्बन्धित सामग्री