Friday, July 05, 2024 03:02:18 AM

बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही

बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : गोखले पुलाच्या उंचीतील तफावत दूर करण्यासाठी बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही, असा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या तज्ज्ञांनी मुंबई महापालिकेला सादर केला आहे. बर्फीवाला उड्डाणपूल पाडण्याऐवजी विशेष तंत्राचा वापर करून पुलाचा स्लॅब उंचावता येऊ शकतो, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

धोकादायक झालेला गोखले पूल नव्याने बांधला जात असून पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मार्गिकेच्या बांधणीत तांत्रिक त्रुटी निर्माण झाली आहे. हा पूल बर्फीवाला पुलाला जोडणे अपेक्षित होते. त्यामुळे एस.व्ही. रोडवरील वाहतूककोंडी टाळून पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रवेश करणे सुलभ होणार होते. मात्र, गोखले पुलाची मार्गिका सुरू झाल्यानंतर पुलाची उंची काही मीटरने वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पुलावरून बर्फीवाला पुलावर जाणे अशक्य बनले आहे. मार्गिका सुरू होऊनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढल्याने निर्माण झालेला घोळ निस्तरण्यासाठी पालिकेने व्हीजेटीआयला साकडे घातले होते.


सम्बन्धित सामग्री