Friday, July 05, 2024 02:42:23 AM

यांत्रिक हातांच्या साहाय्याने पालिका करणार सफाई

यांत्रिक हातांच्या साहाय्याने पालिका करणार सफाई

मुंबई, १४ मार्च २०२४. प्रतिनिधी : मनुष्यबळाच्या आधारे ज्या ठिकाणी स्वच्छता करता येत नाही, अशा ठिकाणी महापालिकेने आता यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात एकूण सात यंत्रे उपयुक्त ठरल्याने आणखी २१ यंत्रे असलेली वाहने लवकरच पालिकेच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहेत. या यंत्राद्वारे सुमारे १४२० लिटर कचरा यामध्ये साठवता येतो. तर १८२५ किलो वजन हाताळण्याची क्षमता आहे. तसेच कचरा ओढण्याच्या पाइपची लांबी ९.३ फूट आहे या यंत्राचा वापर कचरा गोळा करण्यासाठी होतो. रस्त्यावरील कचरापेट्या, पदपथ, उद्याने आदी ठिकाणीही कचरा गोळा करण्यासाठी यंत्रे उपयुक्त आहेत.  


सम्बन्धित सामग्री