Sunday, March 23, 2025 12:07:13 PM

अग्निसुरक्षा यंत्रणा ठप्प पडलेल्या २७८ इमारतींना नोटीसा

अग्निसुरक्षा यंत्रणा ठप्प पडलेल्या २७८ इमारतींना नोटीसा

मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : इमारतींमधील अग्निसुरक्षा धुडकावून लावणे आता सोसायट्यांना महागात पडणार आहे. अग्निशमन दलाने इमारतींमधील अग्निसुरक्षा तपासणीसाठी गेल्या वर्षभरात १३३० इमारतींची इमारतींची तपासणी केली. त्यात २७८ इमारतींमध्ये ही यंत्रणा ठप्प असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या असून यंत्रणा कार्यान्वित न केल्यास वीज व पाण्याच्या जोडण्या कापण्याचा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे.


सम्बन्धित सामग्री