Tuesday, July 02, 2024 09:15:12 AM

दहिसरमध्ये तरूणाची एका इंजेक्शनसाठी धावाधाव

दहिसरमध्ये तरूणाची एका इंजेक्शनसाठी धावाधाव

मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी: दहिसरमधील एका तरुणाला कुत्रा चावल्यानंतर इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शनसाठी एका रुग्णालयातून दुसरीकडे हेलपाटे घालावे लागले. अखेर तब्बल नऊ तासांनंतर हे इंजेक्शन पालिकेच्या नाही तर जेजे रुग्णालयामध्ये जाऊन त्याला घ्यावे लागले. पांडुरंग राणे यांनी ११ मार्च रोजी घडलेल्या एका प्रसंगाची माहिती दिली. एका व्यक्तीचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून झालेली जखम अत्यंत गंभीर स्वरूपाची होती.

राणे यांनी व्यक्तीला घेऊन भगवती रुग्णालयामध्ये धाव घेतली. तिथे त्याला धनुर्वात (टीटी) तसेच रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. त्याला झालेली जखम अतिशय खोल असल्याने त्याला इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शन २४ तासांच्या आत घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र ते इंजेक्शन त्यावेळी रुग्णालयात उपलब्ध नव्हते. केईएम रुग्णालयात इंजेक्शनची उपलब्धता नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रूग्णाला जेजे रुग्णालयात नेण्यात आले. साधारणपणे रात्री साडेनऊ वाजता हे इंजेक्शन देण्यात आले. महापालिकेच्या रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी, मागील काही महिन्यांपासून हे इंजेक्शन महापालिका रुग्णालयांत उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे, असे सांगितले.

              

सम्बन्धित सामग्री