Friday, July 05, 2024 04:08:24 AM

पाण्याचे स्त्रोत आटले

पाण्याचे स्त्रोत आटले

ठाणे, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : उन्हाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात होत नाही तोच शहापूर तालुक्यातील हजारो ग्रामस्थांचे पाण्याचे नियमित स्रोत आटले असून त्यांना आता पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील नऊ गावे आणि ४३ पाड्यांना १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील दोन-अडीच महिन्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत जाणार आहे.

शहापूर तालुक्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या असल्या तरी अद्याप येथील पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होऊ शकलेले नाही. घरातील पाण्याची व्यवस्था करण्यासाठी येथील महिलांना खूप कष्ट करावे लागतात. दूरवरून हंडे आणि कळशांमधून पाणी वाहून आणावे लागते.

१५ हजार ग्रामस्थ टंचाईग्रस्त

तूर्त या परिसरातील १५ हजार २०५ ग्रामस्थ पाणीटंचाईने बाधीत आहेत. त्यांना पाण्यासाठी टँकरशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत त्यांना अशा पद्धतीने पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन महिन्यांत टँकरग्रस्त गावपाडे आणि तेथील रहिवाशांची संख्या वाढणार आहे.


सम्बन्धित सामग्री