Sunday, July 07, 2024 08:23:48 PM

बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं झालं लोकार्पण

बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं झालं लोकार्पण

मुंबई, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईतल्या कोस्टल रोडचं उद्घाटन पार पडलं. त्यानंतर १२ मार्चपासून मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला होणार आहे. या मार्गावरून मुंबईकरांना १२ मार्चपासून सकाळी ८ वाजेपासून प्रवास करता येणार आहे.

कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किमी लांब आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, उन्नत रस्ते, पूल यांचा समावेश आहे.

https://youtu.be/b90plAXW0VI?si=NXoAK9lI2hl8yjl4

सागरी किनारा सेतू - पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये

प्रवासी वाहतुकीसाठी मंगळवार, १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून किनारा मार्ग खुला होईल.
पहिला टप्पा सुमारे साडेदहा किलोमीटर
सध्या वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका खुली होणार
सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री ८ सागरी किनारा मार्ग खुला असेल.
काहीकाळ शनिवार, रविवार कोस्टल रोड बंद राहील
या मार्गावर पार्किंग करण्यास आणि सेल्फी काढण्यास बंदी आहे.
प्रवेश करताना ताशी ४० किमी, बोगद्यात ताशी ६० किमी तर खुल्या मार्गावर ताशी ८० किमी वेगमर्यादा आहे.
दुचाकी, तीनचाकी वाहनांना बंदी
अवजड मालवाहतुकीच्या गाड्यांना बंदी
बेस्ट बस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस वाहतूक शक्य
वेळेची ७०% बचत, प्रदूषणात ३४% घट अपेक्षित


सम्बन्धित सामग्री