Wednesday, July 03, 2024 12:29:48 AM

कोस्टल रोड खुला करण्याचा मुहर्त ठरला

कोस्टल रोड खुला करण्याचा मुहर्त ठरला

मुंबई, ९ मार्च २०२४,प्रतिनिधी : कोस्टल रोड खुले करण्याचा कार्यक्रम ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याची महापालिकेची माहिती आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वहिनीची मार्गिका खुली करणार असल्याची महानगर पालिकेची माहिती आहे. या उद्घाटन समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

सागरी महामार्गाच्या उद्घाटनाला शिउबाठालाही निमंत्रण

वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडच्या उद्घाटन समारंभाला बऱ्याच नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यात शिउबाठाचे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांचं नावही निमंत्रण पत्रिकेत देण्यात आले आहे. त्यामुळे शिऊबाठा गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले असल्याचे समोर आले आहे.  

कोस्टल रोडचे स्वरूप

कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबई ते कांदिवली दरम्यान सुमारे 29 किमीचा आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्याचे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिणेकडील भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले आहे. साउथ कोस्टल प्रोजेक्ट हा साडे दहा किलोमीटरचा पट्टा आहे.


सम्बन्धित सामग्री