Sunday, July 07, 2024 08:47:44 PM

राज्यात दहावीची परीक्षा सुरू

राज्यात दहावीची परीक्षा सुरू

मुंबई, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षांना शुक्रवार १ मार्च २०२४ पासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये दहावीसाठी ५०८६ केंद्रांवर परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी २३ हजार २७२ शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनाने आवश्यक ते उपाय केले आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

        

सम्बन्धित सामग्री